भारतीय जनता पार्टी पुरंदर व सासवड शहर भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम*
सासवड, दिनांक 06 जून 2025: जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, सासवड शहर यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आज, शुक्रवारी, दिनांक 06 जून 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता पालखीतळ, सासवड येथे यशस्वीपणे पार पडला.
पर्यावरण संरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेतील योगदान यावर आपले विचार व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी, सासवड शहर नेहमीच सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिली असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करत राहणार असल्याचे भाजपा शहराध्यक्ष आनंद जगताप यांनी सांगितले.
या वेळी मा.आमदार अशोकभाऊ टेकवडे, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त विश्वासजी पानसे, ॲड. शिवाजी कोलते, समीरजी कामत, शलिलजी महाराज, जयेंद्रजी निकम, मयूरजी जगताप, श्रेयसजी जगताप, ओंकारजी जगताप, राहुलजी भोंडे, रूपालीताई क्षीरसागर, माधवजी शिवरकर, हर्षलजी जगताप, अक्षयजी जगताप, निरंजनजी फडतरे, वेदांत जगताप, ऋषिकेश जगताप आदी उपस्थित होते.






