ब्रेकिंग न्यूज

माहूर विद्यालयात रोटरी ई-लर्निंग सेंटरचे उद्घाटन, विद्यार्थ्यांना मिळणार व्यावसायिक शिक्षणाचे बळ


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::

माहूर विद्यालयात रोटरी ई-लर्निंग सेंटरचे उद्घाटन: विद्यार्थ्यांना मिळणार व्यावसायिक शिक्षणाचे बळ

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माहूर (ता.पुरंदर) येथील माध्यमिक विद्यालयात रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूड आणि नाईस इंडिया सोल्युशन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने १० लाख रुपये खर्चाच्या रोटरी ई-लर्निंग सेंटरचे उद्‌घाटन शुक्रवारी (दि. ४) झाले.

यामध्ये गणित लॅब, ३५ टॅब, ६५ इंची स्मार्ट टीव्ही, इयत्ता ५ वी ते १० वीचा संपूर्ण अभ्यासक्रम असलेली ई-लर्निंग सुविधा, लोखंडी कपाटे पंखे यांचा समावेश असून याचा ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळणार आहे.

याप्रसंगी नाईस इंडियाचे उपाध्यक्ष, सीएसआर कमिटी सदस्य अवन रॉय यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बबुसाहेब माहूरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी राॅय यांनी, विद्यार्थ्यांची शिस्त, शैक्षणिक प्रगती आणि विद्यालयातील उपक्रमाबद्दल कौतुक केले.
रोटरी क्लबच्या अध्यक्षा गायत्री लडकत यांनी विद्यार्थ्यांनी सुविधांचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले.

बबूसाहेब माहुरकर यांनी, श्री शिवाजी शिक्षणचे संस्थापक अध्यक्ष कै. चंदूकाका जगताप यांच्या कार्याचे स्मरण करत, ग्रामीण भागातील, विशेषतः आदिवासी आणि मुली, खऱ्या अर्थाने शिक्षित झाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. नाईस इंडिया कंपनी आणि रोटरी क्लब यांच्या कार्याचे कौतुक करत यामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळून स्वावलंबी होतील असे सांगितले.

याप्रसंगी त्रिपती गुप्ता, सचिन गुल्हाने, हर्षद शिंदे, स्पर्श अग्रवाल, संग्राम गायकवाड, मयुरेश दाते, हेमचंद्र दाते, सत्यजित चितळे, सुहास पटवर्धन, राहुल कोकीळ, यांसह
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक हनुमंत पवार यांनी प्रास्ताविक, महेंद्र भोसले यांनी सुत्रसंचलन केले तर रामप्रभू पेटकर यांनी आभार मानले.


Translate »
error: Content is protected !!