बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी एडवोकेट धर्मेंद्र खांडरे यांची फेर निवड
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी एडवोकेट धर्मेंद्र खांडरे यांची फेर निवड
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक : बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्षपदी एडवोकेट धर्मेंद्र खांडरे यांची फेर निवड करण्यात आली. शिरूर तालुक्यातील बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या वार्षिक सभेत सन 2025 ते 2028 च्या त्रैवार्षिक कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष म्हणून एडवोकेट धर्मेंद्र खांडरे यांची फेर निवड करण्यात आली, तर सचिव म्हणून हेमंत वाभाडे यांची नव्याने नियुक्ती झाली. उपाध्यक्षपदी धनंजय गायकवाड, कोषाध्यक्ष सागर फराटे, सहसचिव नारायण शिंदे, तर विठ्ठल वाघ,
दत्तात्रय करेकर, तानाजी राऊत, सुरेश पडोळे यांची विश्वस्त म्हणून आणि अविनाश भेगडे बाळासाहेब पुडे व गणेश देशमुख यांची विशेष निमंत्रित म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून विनायक थोरात यांनी काम पाहिले.






