प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष , माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांची पुरंदर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा :::
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री, माजी आमदार बच्चुभाऊ कडू पुरंदर तालुका पदाधिकाऱ्यांच्या बरोबर अडचणींच्या संदर्भात चर्चा
सासवड ता.पुरंदर जि.पुणे येथे मंगळवार दि २५ मार्च रोजी महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मा.ना.श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू साहेब यांनी
सासवड येथील प्रहार पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी दिव्यांगानी फटाकेच्या आतिशबाजी करीत ढोल ताशाच्या गजरात बच्चु भाऊंचे स्वागत केले.
ना.बच्चुभाऊ कडू हे प्रहारचे पुरंदर तालुका संपर्कप्रमुख मा.श्री.काशिनाथ अण्णा जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन अण्णांच्या तब्येतीची विचारपूस केली.
तसेच प्रहारचे पुरंदर तालुका सचिव मा.श्री.इम्रान इनामदार यांच्या फळाच्या दुकानावर जाऊन पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिव्यांगांच्या हक्काच्या ०५% निधीबद्दल तसेच दिव्यांगांना सरसकट अंत्योदय योजना चालू व्हावी यासाठी भाऊंना निवेदन देण्यात आले.
तसेच प्रहारचे तालुका सरचिटणीस मा.श्री. हैदरभाई नगारजी यांच्या सासवड शहरातील घड्याळाच्या छोट्याशा दुकानाला सासवड नगरपालिकेने मनमानी पद्धतीने आवाच्या संवा टॅक्स आकारला त्याबद्दल
भाऊंनी सासवड मुख्याधिकाऱ्यांची चर्चा करून माझ्या या दिव्यांगाच्या प्रश्न तात्काळ मिटवा असे आदेश दिले.
यावेळी प्रहारचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.धर्मेंद्रजी सातव पाटील. प्रहारचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. सुरेश दादा जगताप. प्रहारचे पुरंदर तालुका अध्यक्ष मा.श्री.फिरोज भाई पठाण.
प्रहारचे पुरंदर तालुका विभाग प्रमुख मा.श्री.हनुमतं तात्या नेटके. प्रहारचे तालुका कार्याध्यक्ष मा.श्री. दिलीपराव भोसले. पुरंदर तालुका महिला उपाध्यक्षा मा.सौ.छायाताई सकट.
सासवड शहराध्यक्ष मा.श्री.दत्ता दादा दगडे पाटील. सासवड शहरउपाध्यक्ष मा.श्री.लक्ष्मण भाऊ बनसोडकर. प्रहार संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा.श्री.चंद्रकांत आप्पा कसबे. श्रीमती.शोभाताई शितोळे.
श्रीमती.शमीम काजी. मा.श्री.संतोष काळे मा.श्री.शंकर नाना क्षीरसागर. मा.श्री.बाळासाहेब मामा शेवाळे. मा.श्री.नंदकुमार गीते. मा.श्री.दशरथ खळदे. मा.श्री.वसंत दिवसे. मा.श्री.रामदास गिरमे. मा.श्री. गणेश गिरमे. यांस अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते






