शैक्षणिक

कातोबा हायस्कूल दिवे येथे समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा संपन्न आमदार विजय बापू शिवतारे यांची उपस्थिती


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:

कातोबा हायस्कूल दिवे येथे समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा संपन्न

आज दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी कातोबा हायस्कूल, दिवे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची कार्यशाळा उत्साहात पार पडली.

या प्रसंगी पुरंदर-हवेली मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार मा. विजय बापू शिवतारे, पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मा. श्रीमती प्रणोती श्रीश्रीमाळ, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. वैभव डूबल, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. राजेंद्र कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात जि.प. प्राथमिक शाळा भोसलेवाडीची विद्यार्थिनी आरोही नितीन भोसले (इ. ७ वी) हिला नासा व इस्रो संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल गौरविण्यात आले. तिचा व तिच्या पालकांचा – नितीन भोसले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी शिवसेना पुरंदर अध्यक्ष हरिभाऊ लोळे, माजी जि प सदस्य सौ ज्योती झेंडे, याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते.

🌸💐 अभिनंदन आरोही! 💐🌸


Translate »
error: Content is protected !!