ब्रेकिंग न्यूज

राज्यातील चार जलविद्युत केंद्र यांचे खाजगीकरण व वीज क्षेत्रातील खाजगीकरण विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
राज्यातील चार जलविद्युत केंद्र यांचे खाजगीकरण व वीज क्षेत्रातील खाजगीकरण विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

भोर.(प्रतिनिधी)
महानिर्मिती, महावितरण, महापारेषण या तिन्ही शासकीय कंपन्यांतील विविध कामाचे खाजगीकरण , महानिर्मिती मधील भाटघर, पवना, पैठण, येलदरी या जल विद्युत केंद्राचे बीओटी तत्त्वावर खाजगीकरण करणे , महावितरणमधील पुनर्रचना व ३२९ उपकेंद्र हे कंत्राटी पद्धतीने चालविणे या विरोधात विद्युत क्षेत्रातील संघटना संतापल्या आहेत वीज क्षेत्रातील सात संघटनानी एकत्र येऊन ९ ऑक्टोबर ला राज्यव्यापी संपाची नोटीस दिली आहे त्यामुळे सणासुदीत वीज यंत्रणा विस्कळित होण्याची भीती आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते व अधिकारी कृती समिती यांच्या आदेशाने भोर मधील भाटघर जल विद्युत केंद्र जवळील माळवाडी येथे कॉ. कृष्णा भोयर सरचिटणीस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.. भाटघर , पवना, पैठण येलदरी या चार जल विद्युत केंद्राचे बीओटी तत्वावर खाजगीकरण करून मोठमोठ्या उद्योगपतींना विकण्याचा मानस असून कोल्हापूर जिल्ह्यातील देशातील पाहिले राधानगरी जल विद्युत केंद्र बंद अवस्थेत ठेवून चालू करण्यास दाखविलेली उदासीनता हे प्रकटपणे निदर्शनात दिसते .

अदानी, टोरांटो, टाटासह इतर काही खाजगी कंपन्यांनी महावितरण कार्यक्षेत्रातील मोठ्या शहरांमधीलसमांतर वीज वितरण परवान्यासाठी राज्य नियामक आयोगाकडे अर्ज केले आहेत याचा परिणाम भविष्यात मोठा होण्याची भिती आहे महावितरणचे ३२९ उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने वितरणासाठी देत आहेत या सर्वांचा विरोध म्हणून ९ ऑक्टोबर चां राज्यव्यापी संप यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे..


Translate »
error: Content is protected !!