शैक्षणिक

न्यू इंग्लिश स्कूल, जवळार्जुन येथे अजिंक्य टेकवडे यांच्यातर्फे दिवाळी किट वाटप संपन्न


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
उपसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे:

न्यू इंग्लिश स्कूल, जवळार्जुन येथे दिवाळी किट वाटप सोहळा

जवळार्जुन (ता. पुरंदर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अजिंक्य भैय्या टेकवडे (मा. सरपंच, जवळार्जुन व भाजप प्रदेश सचिव) यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम दि. 16 ऑक्टोबर 2025 रोजी अजिंक्य भैय्या मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी राजे राणे (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती जवळार्जुन), सुनील टेकवडे (संचालक, विविध कार्यकारी सोसायटी), विद्यालयाचे मुख्याध्यापक निगडे सर व शिक्षकवृंद, तसेच सौरभ टेकवडे, निरज टेकवडे, महानवर, पत्रकार नवनाथ राणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायकवाड सर यांनी केले, तर शेवटी मान्यवरांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.


Translate »
error: Content is protected !!