जेजुरी – अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी कोळविहींरे येथील ६० वर्षीय आरोपीला अटक
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी कोळविहीरे येथील ६० वर्षीय आरोपीला अटक
पुरंदर | प्रतिनिधी
कोळविहीरे (ता. पुरंदर) येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी झुंबर सिताराम खोमणे (वय ६०, रा. कोळविहीरे, ता. पुरंदर) याच्याविरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोळविहीरे गावच्या हद्दीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीला शेतातील सीताफळ बागेत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आरोपीवर करण्यात आला आहे.
या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. २२७/२०२६ अन्वये BNS कलम 64(1), 64(2)(I), 64(2)(K), 65(2), 351(2), 351(3) तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार (POCSO Act) कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास मपोसई राणे करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.






