सासवडमध्ये” ड्रंक अँड ड्राईव्ह” विरोधात सासवड पोलिसांची विशेष मोहीम ; श्रीनाथ चौकात वाहन चालकांची तपासणी
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’विरोधात पोलिसांची विशेष मोहीम; श्रीनाथ चौकात वाहनचालकांची तपासणी
सासवड | प्रतिनिधी
सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सासवड शहरातील श्रीनाथ चौक येथे ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’विरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान सासवड पोलीस स्टेशनचे अधिकारी व सर्व अमलदार प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले. श्रीनाथ चौक परिसरात नाकाबंदी करून वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना चांगलाच आळा बसण्यास मदत होणार असून, सर्वसामान्य नागरिकांकडून या मोहिमेचे कौतुक करण्यात येत आहे.
सासवड शहरात अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ तपासणी मोहीम वारंवार राबविण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.






