विकासाला गती देण्यासाठी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची सासवडला भेट!
संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सासवडच्या रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी,
राज्यमंत्री मा. श्री. माधुरीताई मिसाळ यांची भेट.
महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री मा. ना. माधुरीताई मिसाळ यांची नुकतीच भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने सासवड शहरातील विविध नागरी समस्या आणि रखडलेल्या विकास प्रकल्पांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून मागण्यांचे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
या बैठकीत प्रामुख्याने सासवड शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक असणारा निधी, प्रस्तावित १४३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, रखडलेली ड्रेनेज योजना तसेच शहरातील उद्यानांच्या विकासासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. सासवडकरांच्या या प्रश्नांवर राज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
याप्रसंगी भाजपा सासवड शहर अध्यक्ष आनंदभैय्या संजय जगताप, भाजपा सासवड शहर सरचिटणीस राहुल भोंडे, उपाध्यक्ष उदयराज जगताप, सचिव ओंकार महागावकर, इ. उपस्थित होते.






