जेजुरीत सेफ्टी टॅंक मध्ये दीड वर्षे चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू, दवणेमळ्यात शोक कळा!!
जेजुरीत हृदयद्रावक घटना!
सेफ्टी टँकमध्ये बुडून दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील दवणेमळा परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. शिव अविनाश हितापूर (वय १.५ वर्षे) हा चिमुकला सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाला.
कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी परिसरात शोध घेतल्यानंतर जेजुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. शोधमोहीम सुरू असताना घराजवळील सेफ्टी टँकमधील पाण्यात बुडबुडे दिसल्याने संशय आला. टँकमधील पाणी काढल्यानंतर चिमुकला त्यामध्ये आढळून आला.
तातडीने त्याला जेजुरी येथील आयसीयू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जेजुरी पोलिस पुढील तपास करत आहेत






