ब्रेकिंग न्यूज

बँकांना वित्त पुरवठा करणारी आपली स्वतःचीच बँक स्थापन करणार – माजी आमदार अशोक टेकवडे


अजित मल्टीस्टेटची आर्थिक भरारी; ६७.४७ लाखांचा निव्वळ नफा, बँकांना वित्तपुरवठा करणारी आपली स्वतःचीच बँक स्थापन करणार -मा आ अशोक भाऊ टेकवडे

सासवड | प्रतिनिधी

आर्थिक शिस्त, सभासदांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण व्यवसायवाढीच्या बळावर अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडने यंदाच्या आर्थिक वर्षात ६७ लाख ४६ हजार ९७६ रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. संस्थेच्या स्थापनेला १४ वर्षे पूर्ण झाली असून, या कालावधीत संस्थेने २३ शाखांपर्यंत विस्तार करत महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात कार्यक्षेत्र वाढविले आहे.

सासवड येथील संस्थेच्या सभागृहात अजित मल्टीस्टेटची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत संस्थेच्या आर्थिक कामगिरीचा, व्यवसायवाढीचा आणि आगामी वाटचालीचा आढावा घेण्यात आला.

संस्थेकडे १०३ कोटी १ लाख रुपयांच्या ठेवी, तर ८९ कोटी ६२ लाख ८४ हजार रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. संस्थेचे शेअर्स ५ कोटी ८० लाख रुपये असून, सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त होत आहे. यंदाही सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

१४ वर्षांची विश्वासाची वाटचाल

ग्रामीण व निमशहरी भागातील सभासदांना बचत, कर्ज आणि विविध आर्थिक सेवा उपलब्ध करून देताना संस्थेने सहकाराच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांना चालना दिली आहे. २३ शाखांपर्यंत झालेला विस्तार हा संस्थेच्या वाढत्या व्यवसायाचा आणि सभासदांच्या विश्वासाचा द्योतक असल्याचे चेअरपर्सन विजया टेकवडे यांनी सांगितले.

सभेच्या प्रारंभी अशोक टेकवडे, विजया टेकवडे, प्रवीण भोसले, पंकज घोणे, अजिंक्य टेकवडे, सुजाताई ढमाले, सोनम साकोरे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी संचालक मंडळ, सल्लागार, सभासद, शाखा प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक अजिंक्य टेकवडे यांनी केले, सूत्रसंचालन निखिल जगताप यांनी केले, तर आभार बी. एम. काळे यांनी मानले.

📊 संस्थेची आर्थिक स्थिती

निव्वळ नफा: ₹६७.४७ लाख

शेअर्स: ₹५.८० कोटी

ठेवी: ₹१०३.०१ कोटी

कर्जवाटप: ₹८९.६३ कोटी

शाखा: २३

कार्य क्षेत्र: महाराष्ट्र व मध्य प्रदेश

लाभांश: १० टक्के

ऑडिट वर्ग: ‘अ’


Translate »
error: Content is protected !!