आस्करवाडी तील ताहीती हॉटेलवर अवैध हुक्का बारवर छापा ; 67 हजारांचा मुद्द्यामाल जप्त- सासवड पोलिसांची कामगिरी
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
आस्करवाडीतील ताहिती हॉटेलवर अवैध हुक्का बारवर छापा; ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त
पुरंदर | प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथील ताहिती हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित अवैध हुक्का बारवर सासवड पोलिसांनी छापा टाकला. ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिस पथकाने पंचांसह हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी तीन टेबलवर ९ जण हुक्का सेवन करताना आढळून आले. हॉटेल चालक म्हणून सरांजित सुजित मंडल (वय २७) याचे नाव समोर आले.
हॉटेलची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी ३८ काचेचे हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थांचे ३ डबे, २० मातीच्या चिलमी आणि ३८ रबरी पाइप, असा एकूण ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
FIR मध्ये नमूद केल्यानुसार, हुक्का सेवनासाठी एका पॉटचे ५०० रुपये आकारले जात असल्याची माहिती उपस्थित ग्राहकांनी पोलिसांना दिली. कारवाईदरम्यान हुक्का सेवन करणाऱ्या नऊ ग्राहकांना समज देऊन सोडण्यात आले.
या प्रकरणी सरांजित सुजित मंडल याच्याविरोधात सासवड पोलीस ठाण्यात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा कलम 4A व 21A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अविनाश हरिभाऊ होळकर करीत आहेत.






