सासवडला पाणीपुरवठा करणारे ‘गराडे धरण हाऊसफुल्ल ‘ जल पूजन करून व्यक्त केली निसर्गासाठी कृतज्ञता!
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवडला पाणीपुरवठा करणारे गराडे धरण ‘हाऊसफुल्ल’; जलपूजन करून व्यक्त केली निसर्गाप्रती कृतज्ञता
सासवड (प्रतिनिधी): सासवड शहर व परिसराची तहान भागवणारे जीवनदायिनी गराडे धरण आज शंभर टक्के भरल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आनंददायी क्षणाचे औचित्य साधून धरणस्थळी विधिवत जलपूजन करण्यात आले.
धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सासवड शहराच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून, यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत धरणाच्या पाण्याला साडी-चोळी, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थितांनी निसर्गाचे आभार मानत एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
या जलपूजन सोहळ्यास भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य मा. गंगारामदादा जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी भाजपा सासवड शहराध्यक्ष आनंद भैय्या संजय जगताप, किसान मोर्चा शहराध्यक्ष जालिंदर जगताप, शहर उपाध्यक्ष उदयराज जगताप, शहर सचिव ओंकार महागावकर, शिवाजीबापू जगदाळे, सुनीलतात्या जगदाळे, समीर तरवडे, संदीप कदम, दत्तात्रयआण्णा जगदाळे, बाळासाहेब यादव, भानुदासनाना रावडे, सुभाष जगदाळे, प्रभाकर जगदाळे, संजयनाना रावडे, शांताराम रावडे, संदीप जगदाळे, लक्ष्मण जगदाळे, श्रेयश शेवाळे, अमोल जगदाळे, ओंकार जगदाळे, सोमनाथ जगदाळे, सुजल जगदाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गराडे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सासवड परिसरातील पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली असून, यंदाच्या समाधानकारक पावसाबद्दल निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.






