ब्रेकिंग न्यूज

काळेवाडीत भरधाव कॅरीची ट्रकला धडक ; अपघातात 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
काळेवाडीत भरधाव कॅरीची ट्रकला धडक; अपघातात २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

सासवड-हडपसर रोडवरील काळेवाडी हद्दीत हिमालय हॉटेलसमोर भरधाव वेगातील कॅरी गाडीने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखेरूल मोतीलाल शेख (रा. नानूर, जि. बीरभूम, पश्चिम बंगाल) हा सुझुकी कॅरी गाडी क्रमांक MH 12 VT 6745 चालवत होता. त्याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोर असलेल्या ट्रक क्रमांक MH 12 KP 6899 च्या मागील बाजूस कॅरीची जोरदार धडक झाली.

या अपघातात मनोयार सराफत हुसेन (वय २८, रा. बेलहटी, जि. बीरभूम, पश्चिम बंगाल) यांच्या डोक्याला, मानेला आणि उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा या अपघातात मृत्यू झाला. तसेच कॅरी गाडीचेही नुकसान झाले.

या प्रकरणी मृताचे भाऊ आतुर रहमान सराफत मोल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ४०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३२४(४) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार अभिजीत कांबळे करीत असून, प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


Translate »
error: Content is protected !!