ताज्या घडामोडी

हडपसर सासवड पालखी महामार्ग रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे


प्रतिनिधी सहयाद्री माझा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग हडपसर ते सासवड सासवड ते लोणंद फलटण

पंढरपूर हा महामार्ग सुरुवातीला राज्य सरकारकडे होता

त्याचं हस्तांतरण नॅशनल हायवे प्राधिकरण कड झालं

यानंतर पहिला टप्पा लोणंद ते दिवेघाट याच ई-टेंडरिंग

होऊन कामकाज सुरू झालं प्रथम चौपदरीकरणाचा रस्ता हा तीन पदरी झाला, परंतु मुख्य अडचण ही हडपसर ते दिवे

घाट माथा म्हणजे झेंडेवाडी हा रस्ता एकदम क्लिष्ट

परिस्थितीमध्ये त्याची वाटचाल चालू होती, मागील काही

काळामध्ये अनेक अपघात हडपसर गाडीतळ ते दिवेघाट

पर्यंत मोठ्या प्रमाणावर होऊन मोठी जीवितहानी व

वित्तहानी झाली, याला वाचा फोडण्याचे काम मा. सनदी

अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या माध्यमातून होत

असताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

यांच्याबरोबर विविध चर्चा तसेच या टप्प्याविषयी काही

सूचना यामध्ये वन प्राधिकरण असेल, हडपसर उरुळी

फुरसुंगी वडकी येथील ग्रामस्थांच्या बरोबर चर्चा करून या

रस्त्याला परवानगी मिळून पुढील काही महिन्यातच या

रस्त्याला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, हडपसर ते दिवे घाट

रस्त्यासाठी 480 कोटीची निविदा निघाली असून यासाठी

विशेष प्रयत्न करणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे

खासदार सुप्रियाताई सुळे खा.शरद पवार, हडपसर उरुळी

फुरसुंगी वडकी येथील ग्रामस्थांचे आभार संभाजीराव झेंडे यांनी मानले


Translate »
error: Content is protected !!