ताज्या घडामोडी

भारतीय बेटी धनाची पेटी तर आहेच पण डॉक्टर म्हणजे सर्व सामान्य नागरिकांचा देव, आणि डॉक्टर म्हणजे राष्ट्रीय संपत्ती,-बंडू काका जगताप


भारतीय बेटी हि धनाची पेटी तर आहेच पण डॉ म्हणजे सर्व सामान्य नागरिकांचां देव, आणि डॉक्टर म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे-श्री बंडू काका जगताप.

कलकत्ता येथील आर जी मेडिकल कॉलेज येथे महिला डॉक्टर आपली ड्युटी संपवून घरी जात असताना त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून बलात्कार करून क्रूर हत्या करण्यात आली सबब महिला युवती डॉक्टरवर जो अन्याय झाला त्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन आणि पुरंदर मेडिकल

असोशियन यांनी जो 24 तासाचा काम बंद आंदोलन संप पुकारला त्याला अनुसरून पुरंदर तालुक्यातील आम जनतेच्या वतीने सासवड नगरपालिकेसमोर क्रूर हत्या करणाऱ्या आरोपीस कठोरातली कठोर कारवाई शासन करून गुन्हा दाखल करण्यात यावा या विषयावर निषेध मोर्चा आयोजित

केलेला होता सदरचे आंदोलनाचे निवेदन माननीय तहसीलदार पुरंदर आणि पोलीस निरीक्षक अधिकारी सासवड पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले खरंतर या डॉक्टर महिलेची हत्या झाल्याने संपूर्ण भारत देश आणि भारत देशातील

नागरिक संताप व्यक्त करून डॉक्टर महिलेबद्दल हळहळ व्यक्त करत होते आणि अशा या निंदनीय घटनेचा पुरंदर तालुक्यातील आम जनतेच्या वतीने सर्वपक्षीय निषेध केला


Translate »
error: Content is protected !!