ब्रेकिंग न्यूज

गॅस सिलेंडरच्या स्फोटात घराचे छत उडाले ; कोळविहिरे येथील लव्हाळे वस्तीतील घटना


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
गॅस सिलेंडरच्या स्फोटात घराचे छत उडाले; कोळविहिरे येथील लव्हाळे वस्तीतील घटना

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जेजुरी–कोळविहिरे येथील लव्हाळे वस्ती परिसरात शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर २०२६) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरातील स्वयंपाकघरात गॅस लिकेज झाल्याने गॅस सिलेंडरचा जोरदार स्फोट झाल्याची घटना घडली.

या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, संबंधित घराचे संपूर्ण छत उडून अंदाजे ५० ते ६० फूट अंतरावर जाऊन पडल्याची माहिती मिळत आहे. तसेच घरातील गृहपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गॅस लिकेजमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनेचे नेमके कारण व झालेल्या नुकसानीचा पंचनामा संबंधित यंत्रणेकडून केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.


Translate »
error: Content is protected !!