सासवडच्या शिवतीर्थावर राहुल गांधी यांच्या विरोधात महायुतीच आंदोलन
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
आरक्षण रद्दचा विचार करू, भारत हे सामाजिक दृष्ट्या अनुकूल ठिकाण बनल्यावर काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार करेल असे विधान राहुल गांधी यांनी अमेरिके च्या दौऱ्या दरम्यान केले होते निषेध म्हणून पुरंदर तालुका
महायुतीच्या घटक पक्षांनी सासवड शिवतीर्थ या ठिकाणी राहुल गांधींना काळे फासत चपला मारत निषेध केला, यावेळी पुरंदर तालुक्याचे माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे, भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे, आरपीआयचे पुरंदर
अध्यक्ष पंकज धिवार, भारतीय जनता पार्टीचे श्रीकांत ताम्हाने यांनी राहुल गांधीवर हल्लाबोल करताना काँग्रेस पक्षाचे वाभाडे काढले,
या निषेध आंदोलनामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, पुणे जिल्हा शिवसेना अध्यक्ष दिलीप यादव, यावेळी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष गंगाराम दादा जगदाळे, पुरंदर अध्यक्ष हरिभाऊ लोळे,
भारतीय जनता पार्टी पुरंदर अध्यक्ष निलेश जगताप, भाजप सासवड अध्यक्ष संतोष जगताप, उमेश गायकवाड, नितीन पोटे, भाजपाचे गणेश मेमाने, दिलीप कटके, राजेश दळवी, भाजप पुरंदर महिला अध्यक्ष मंगल पवार, श्रीकांत टिळेकर, मंगेश भिंताडे, अविनाश बडदे, चंद्रकांत जगताप,
या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ गट पुरंदर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या चारही पक्षातील महायुतीतील सर्वच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे आंदोलन करण्यात आले






