ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नारायणपूर मध्ये विश्वचैतन्य श्री सद्गुरु नारायण महाराज यांना वाहिली आदरांजली


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे परमपूज्य विश्वचैतन्य श्री सद्गुरू नारायण महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.

गेल्या सोमवारी त्यांना देवाज्ञा झाली. समाज कार्यातील महाराजांचं योगदान हे अमूल्य राहिलं आहे. व्यसनमुक्ती चळवळ, सामुदायिक शेती व श्रमदानाचे उपक्रम राबवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. मी आणि संपूर्ण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराजांचे शिष्यगण व भाविकभक्तांच्या दुःखात सहभागी आहे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले व संवेदना व्यक्त केल्या

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा दिगंबर दुर्गाडे, नारायणपूर देवस्थानचे प्रमुख पोपट महाराज, भरत नाना शिरसागर रामभाऊ बोरकर, ईश्वर बागमार, माजी सरपंच चंद्रकांत बोरकर याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदरचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते


Translate »
error: Content is protected !!