सासवड मध्ये कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा ; तिघा विरुद्ध गुन्हा दाखल
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सासवडमध्ये कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सासवड, ता. पुरंदर : सासवड पोलीसांनी खंडोबानगर झोपडपट्टी परिसरात कल्याण मटका जुगारावर धाड टाकून तिघांविरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ₹51,355 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुरेश किवळे (सासवड पोलीस स्टेशन) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी सोमनाथ बाळू खोमणे (रा. खंडोबानगर, सासवड), दत्तात्रय रामचंद्र पवार (रा. खंडोबानगर, सासवड) आणि दादू बाळू चव्हाण (रा. नाईकवाडा, सासवड) यांच्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 356/2026 अन्वये मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 3.45 वाजण्याच्या सुमारास खंडोबानगर झोपडपट्टी परिसरात आरोपी कल्याण मटका जुगार चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान ₹11,320 रोख रक्कम, तीन मोबाईल फोन, डायऱ्या, बॉलपेन, मटक्याच्या चिठ्ठ्या आणि “हिम्मत सागर” नावाचा मटका चार्ट असा जुगारासाठी वापरला जाणारा साहित्य जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करीत असून, कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.






