जेजुरी – मोरगाव रोडवर मालवाहू ट्रकचा अपघात; महावितरण च्या टावर लाईनच्या खांबाला धडक
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
उपसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे::
जेजुरी–मोरगाव रोडवर मालवाहू ट्रकचा अपघात; महावितरणच्या टॉवर लाईनच्या खांबाला धडक
जेजुरी–मोरगाव रोडवर जवळा अर्जुन पाटी परिसरात मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या टॉवर लाईनच्या खांबाला धडकून अपघात झाला. हा अपघात दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १२ वाजता घडला.
संभाजीनगर येथून उरुळी कांचनकडे मका घेऊन जाणारा दहा टायरचा ट्रक (क्रमांक एम.एच. ४१ ए.यू. ३८७३) चालवत असताना चालक बबन रतन देवरे यांना डुलकी लागल्याने ट्रकचा ताबा सुटून तो थेट महावितरणच्या टॉवर लाईनच्या खांबावर धडकला.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रकमधील सुमारे २० टन मकाही नुकसानग्रस्त झाली आहे. धडकेत महावितरणच्या टॉवर लाईनचा खांब वाकला आहे.
घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.






