सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ; पुरंदर तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन.
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी; पुरंदर तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
पुरंदर तालुक्यातील सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज तहसीलदार, पुरंदर तसेच तालुका कृषी अधिकारी, पुरंदर यांना निवेदन देण्यात आले.
नुकतेच सिताफळाच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, बहुतांश बागांमध्ये यंदा फुलोरा आणि फळधारणा अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अशा बागांचे कृषी सहाय्यक आणि गावकामगार तलाठी यांच्या माध्यमातून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी महत्त्वाच्या बैठकीसाठी बाहेरगावी असल्याने कृषी अधीक्षक श्री. तुषार चंद्रकांत भांड यांनी निवेदन स्वीकारले.
हे निवेदन शिवसेना गणप्रमुख नवनाथ गायकवाड (बेलसर-माळशिरस गण), शाखाप्रमुख प्रवीण कामथे तसेच शिवरी ग्रामस्थ आणि पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार, पुरंदर व तालुका कृषी अधिकारी, पुरंदर यांना देण्यात आले.






