पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या पुरंदर तालुका पूर्व विभाग प्रसिद्धीप्रमुख पदी नवनाथ राणे यांची बिनविरोध निवड
मुख्य संपादक हनुमंत वाबळे:
उपसंपादक नवनाथ राणे:
वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र
पुणे जिल्हा – पुरंदर तालुका (पूर्व विभाग) वारकरी साहित्य परिषदेच्या पुरंदर तालुका (पूर्व विभाग) प्रसिद्धी प्रमुखपदी नवनाथ अण्णासो राणे यांची निवड करण्यात आली.
बारामती व पुरंदर तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने मोरगाव येथे वैष्णवांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. प. भाऊसाहेब महाराज हांडे, जिल्हाध्यक्ष (वा. सा. प. पुणे जिल्हा) हे होते.
कार्यक्रमाचे संयोजन ह. भ. प. मोहन महाराज पवार, अध्यक्ष (वा. सा. प. पुरंदर) आणि विलास बापू कदम, अध्यक्ष (वा. सा. प. बारामती) यांनी केले.
या मेळाव्यात बारामती व पुरंदर तालुक्यांची नवीन कार्यकारिणी निवडून देण्यात आली. नवनिर्वाचित सदस्यांना ह. भ. प. हांडे महाराज यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.
पुरंदर तालुका वारकरी साहित्य परिषदेची कार्यकारिणी:
अध्यक्ष: ह. भ. प. मोहन महाराज पवार
कार्याध्यक्ष: माणिक पांडुरंग पवार
उपाध्यक्ष: अनंता गोपाळा कापरे, विजय मुकुटराव अधिकारी
खजिनदार: शंकर राघू मस्के
सचिव: भगवान एकनाथ कापरे
सहसचिव: विलास गणपत नाळे
प्रसिद्धी प्रमुख (पश्चिम): संभाजी नारायण महामुनी
प्रसिद्धी प्रमुख (पूर्व): नवनाथ अण्णासो राणे
संघटक: अशोक नरसिंह पेटकर
तसेच इतर ७ सदस्यांसह एकूण १७ जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या वेळी प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून
जिल्हा उपाध्यक्ष: माऊली आबा कुंजीर
जिल्हा सचिव: तानाजी खराडे
महिला अध्यक्ष: सविता ताई गवते
महिला प्रतिनिधी: सुमनताई वायकर, रेखाताई ताकवले (महिला अध्यक्ष – पुरंदर तालुका)
विलास उंद्रे, भाऊसो गावडे, हिंगणे बापू, विजय महाराज अधिकारी (माहूर)
पुरंदर उपाध्यक्ष: अनंता कापरे, भगवान कापरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात ह. भ. प. हांडे महाराजांनी “तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून समाजसेवा करावी” असा प्रेरणादायी संदेश दिला.
या प्रसंगी बारामती व पुरंदर तालुक्यातील जेष्ठ आदर्श शिक्षक, उद्योगपती, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजसेवक व माजी सैनिक यांना जिल्ह्याच्या वतीने ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.
बाळासो टेकवडे यांना ‘आदर्श बागायतदार’ म्हणून विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत भक्तीभावाने, उत्साहात व एकात्मतेच्या वातावरणात पार पडला.






