जमीन देण्यासंदर्भात ठराव दिलेल्या एखतपूर मुंजवडी गावा मधूनच दीडशे हरकती; तर विमानतळाला 60% जमीन देणाऱ्यांची नावे जाहीर करा
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा::
जमीन देण्यासंदर्भात ठराव दिलेल्या एखतपुर- मुंजवडी गावा मधूनच दीडशे हरकती; तर विमानतळाला 60% जमीन देणाऱ्यांची नावे जाहीर करा
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या विमानतळा बाबत बाधित गावातील ग्रामस्थ, नागरिक आता प्रशासनाच्या वतीने, प्रसिद्ध माध्यमांना देण्यात येणाऱ्या चुकीच्या बातम्या संदर्भात आक्रमक झाले आहेत. नुकतेच काही वृत्तपत्रांमधून 60% शेतकरी जमीन देण्यास तयार असून,
या बाधित गावातील शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटल्याचे म्हटले आहे. सदर वृत्ताचे बाधित शेतकऱ्यांनी, खंडन केले असून, उलट प्रशासनास त्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. दि. ३ जून रोजी एकरी दहा कोटी दर दिल्यास, एखतपुर- मुंजवडी गावचे शेतकरी जमीन देण्यास तयार असे, ग्रामसभा घेऊन सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात सुमारे दीडशे पेक्षा जास्त हरकती त्या गावांमधून आल्या आहेत.
तसेच तो ठराव गाव पातळीवरील एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीच्या दबावाखाली दिला असल्याची, चर्चा असून, त्याच व्यक्तीने सहा जणांचे शिष्टमंडळ देखील, जिल्हाधिकारी यांच्या भेटीला नेण्याची चर्चा आहे, काही एजंट व शासकीय कर्मचारी व तो राजकीय नेता या भागातील शेतकऱ्यावर सत्ताधारी राजकीय पक्षाच्या माध्यमातून, दबाव आणत आहे.
या भागातील जमिनी देण्यासाठी राजकीय पक्षांची एजंट व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक देखील सक्रिय झाले असून, या भागात जमीन खरेदी विक्रीला बंदी असली, तरी नोटरी व खाजगीत कोऱ्या स्टॅम्पवर टोकन, मोबदला देण्याचे प्रमाण वाढले आहे.
या उलट, सुलट वृत्ता बाबत पाचही गावचे सरपंच व संघर्ष समितीचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पारगाव, खानवडी, कुंभारवळण, उदाची वाडी व वनपुरी या ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारचे ठराव दिलेले नसून, या सभेमध्ये शेतकऱ्यांनी पुढील भविष्याचा विचार करता,
जमीन देणे योग्य नाही आणि म्हणून जमीन देण्यास विरोध राहील, अशाच प्रकारची भूमिका घेतलेली असल्याने, कोणताही मोबदला नाही व अशा प्रकारच्या ठरावही तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांना दिलेला नाही. सदर वृत्त हे शेतकऱ्यांची मानसिकता बिघडवणारे आहे, असा संताप व्यक्त केला जात आहे.
मंजुषा गोपाळ गायकवाड, सरपंच कुंभारवळण यांचे निवेदन, वास्तविक नेमलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या लोकांनी हरकती द्यायला आलेल्या शेतकऱ्यांना दबाव टाकून, वारंवार सहमती द्या, म्हणून मत परिवर्तन करण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत. ज्या ज्या गुंतवणूकदारांनी शेतकरी म्हणून, शेती घेतलेली आहे ते थोडेफार लोक प्रशासनाच्या गळाला लागलेले असतील,
याचा येथील भूमिपुत्र जमिनी द्यायला तयार आहेत, असा कृपया शासनाने अर्थ काढू नये, दोन हजार हरकती आल्या यांच्यावरून हा विरोध लक्षात घ्यावा, सामान्य शेतकरी हे अजूनही विरोधात आहेत, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे, जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या ग्रामपंचायतीचे ठराव आले आहेत, ते प्रसिद्ध माध्यम आधारे जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






