क्राईम न्यूज

जेजुरीत मोटर वायडिंग दुकान फोडून 42 हजारांच्या पाणबुडी मोटारींची चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल :


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
जेजुरीत मोटर वायंडिंग दुकान फोडून ₹42 हजारांच्या पाणबुडी मोटारींची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जेजुरी (प्रतिनिधी): जेजुरी-मोरगाव रोडलगत असलेल्या मोटर दुरुस्ती व वायंडिंग दुकानात अज्ञात चोरट्याने पत्रा कापून प्रवेश करत ₹42 हजार किमतीच्या पाणबुडी मोटारी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन मनोहर कदम (वय 41, रा. दौडज, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. ही चोरी दि. 24 जुलै 2026 रोजी रात्री 8.00 ते 25 जुलै 2026 रोजी सकाळी 8.30 या कालावधीत जेजुरी-मोरगाव रोडलगत हेमंत जगन्नाथ खोमणे यांच्या पत्र्याच्या गाळ्यात असलेल्या मोटर दुरुस्ती दुकानात घडली.

अज्ञात चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील पत्रा कापून आत प्रवेश केला व टेक्समो कंपनीची 7.5 एचपीची एक पाणबुडी मोटर तसेच विविध कंपन्यांच्या 5 एचपीच्या चार पाणबुडी मोटारी, असा एकूण ₹42 हजारांचा माल चोरून नेला.

या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 198/2026 भारतीय न्याय संहिता कलम 334(1), 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार पिंगळे पुढील तपास करीत आहेत.


Translate »
error: Content is protected !!