ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांच्या तत्परतेमुळे भेकर जातीच्या हरणाचे वाचले प्राण


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

विद्यार्थ्यांच्या तत्परतेमुळे भेकर जातीच्या हरणाचे प्राण वाचले

केतकावळे – आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान दाखवत भेकर जातीच्या हरणाचे प्राण वाचवले.

गावाजवळील डोंगर उतारावर भटक्या कुत्र्यांनी एका भेकरावर हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना विद्यालयातील हर्षद खाटपे, सार्थक मिसाळ, आदित्य मिसाळ व राहुल नांदघुरे या विद्यार्थ्यांनी पाहताच त्यांनी तात्काळ विद्यालयाचे शिक्षक श्री. भोंगळे सर, श्री. धाडवे सर तसेच मुख्याध्यापक दीपक गायकवाड यांना माहिती दिली.

शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून कुत्र्यांना हुसकावून लावले व जखमी भेकराला विद्यालयात आणून प्राथमिक उपचार केले. यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला.

वनरक्षक अक्षय लव्हाळे, वनसेवक रघुनाथ मिसाळ व चालक रणजीत चव्हाण यांनी लगेच विद्यालयात येऊन पुढील उपचारासाठी भेकराला तालुक्याच्या ठिकाणी हलवले.

मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले.


Translate »
error: Content is protected !!