ताज्या घडामोडीपुणे

सासवड येथे श्रीमंत गोदाजीराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार हेमंत ताकवले यांचा सत्कार


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा::

सासवड येथे श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार ताकवले यांचा सत्कार

सासवड (प्रतिनिधी ) सासवड येथील जेष्ठ पत्रकार हेमंत ताकवले यांचा श्रीमंत महापराक्रमी गोदाजी राजे जगताप प्रतिष्ठान (भारत) यांच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने किल्ले पुरंदरवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने विशेष सन्मान तसेच आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने

चंद्रकांत तथा काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाने पत्रकार पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला त्या निमित्ताने श्रीमंत महापराक्रमी गोदाजी राजे जगताप प्रतिष्ठानच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.

सासवडचे माजी नगराध्यक्ष प्रमोददादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वामनतात्या जगताप, गावचे पाटील संग्राम जगताप,चैत्री उत्सवाचे माजी अध्यक्ष वैभव जगताप, मयुरशेठ जगताप, अजुकाका जगताप, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष उमेशभय्या जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला. भावी काळात आपल्याकडून असेच समाजोपयोगी कार्य करण्यात यावे अशी अपेक्षा वामन जगताप यांनी यावेळी व्यक्त केली


Translate »
error: Content is protected !!