ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

सासवडमध्ये 11 जूनला संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा सन्मान सोहळा होणार — मा आ संजय जगताप


सह्याद्री माझा सासवड प्रतिनिधी बापू मुळीक ::

सासवडमध्ये ११ जूनला ‘संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा’ सन्मान सोहळा

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक ता. 21 : संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने आणि संत सोपानकाका फाउंडेशन व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा” उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा ११ जून रोजी सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात माजी आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

माजी आमदार शिक्षणमहर्षी स्व. चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त पुणे विभागातील ५ जिल्ह्यांतील ६२ तालुक्यांमधील सुमारे ३५०० शाळांमध्ये आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, गुणवत्ता आणि भौतिक सुविधा या निकषांवर आधारित हा उपक्रम राबविण्यात आला. यात उत्कृष्ट ठरलेल्या माध्यमिक शाळांना सन्मानित केले जाणार आहे.

सुमारे पाच लाखांहून अधिक रकमेची बक्षीसे दिली जातील, उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे अशी माहिती संयोजन समितीचे प्राचार्य नंदकुमार सागर यांनी दिली.

या शैक्षणिक वर्षात विभाग आणि जिल्हा स्तरावर शाळांची निवड करण्यात आली. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हे अभियान यशस्वी झाले. विभाग स्तरावरील ५ उपक्रमशील शाळांचा विशेष सन्मान केला जाईल. जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रथम तीन क्रमांकाच्या शाळांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, शॉल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात येईल.

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील विजेत्या शाळांचाही यावेळी सन्मान होणार आहे, असे समन्वयक कुंडलिक मेमाणे यांनी सांगितले.

माजी आमदार संजय जगताप म्हणाले, “स्व. चंदूकाका जगताप यांना अभिप्रेत असलेल्या निकषांवर शैक्षणिक संस्था चालवणे आणि त्यांच्या स्वप्नातील हा उपक्रम पाच जिल्ह्यांत राबवून विद्यालयांमध्ये आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, गुणवत्ता आणि भौतिक सुविधा बाबींची जपणूक करणे हा यामागचा उद्देश आहे.”

या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजय जगताप, संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया, बँकेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, समन्वय समितीचे सदस्य प्राचार्य नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, वसंतराव ताकवले, विश्वजीत आनंदे

उपस्थित होते.

पुणे विभागातील उपक्रमशील शाळा (अनुक्रमे):
* प्रथम: कुलस्वामी खंडेराय विद्यालय, हिवरे तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे.
* द्वितीय: सौ. कस्तुरबेन भगबानदास दामाणी हायस्कुल, सांगली.
* तृतीय: शंभू महादेव विद्यालय, मरकुटे मलबडी, ता. माण, जि. सातारा.
* चतुर्थ: सहस्रार्जुन विद्यामंदिर, सोलापूर.
* पाचवा: स्वा.सै.मा.ग. पाटील आदर्श विद्यानिकेतन अॅन्ड ज्युनि. कॉलेज, मिणचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.

जिल्हास्तरीय प्रथम तीन क्रमांकाची विद्यालये:
* पुणे:
* प्रथम: श्री संभाजीराजे विद्यालय, जातेगाव बु।।, ता. शिरूर.
* द्वितीय: एच. एच. सी. पी. हायस्कुल, हुजुरपागा, लक्ष्मी रोड, पुणे-३०.
* तृतीय: श्रीयोग माध्यमिक विद्यालय, बेटवाडी, ता. दौड.

* सांगली:
* प्रथम: महाराष्ट्ररत्न वि.स. पागे कृषी माध्यमिक विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय, तासगाव.
* द्वितीय: भारतमाता विद्यालय अॅन्ड ज्युनि. कॉलेज, चिकुड.
* तृतीय: न्यु इंग्लिश स्कुल, खंडेराजुरी.

* सातारा:
* प्रथम: श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कुल, भरतगाववाडी, ता. जि. सातारा.
* व्दितीय: मुधाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देऊर, ता. कोरेगाव.
* तृतीय: केदार हायस्कुल, सुपने, ता. कराड.

* सोलापूर:
* प्रथम: धर्मवीर संभाजी विद्यालय, गौंडरे, ता. करमाळा.
* द्वितीय: माध्यमिक प्रशाला, बडवळ, ता. मोहोळ.
* तृतीय: श्री शंकरलिग प्रशाला, हत्तीकणबस, ता. अक्कलकोट.

* कोल्हापूर:
* प्रथम: सरस्वती हायस्कुल, इचलकरंजी, ता. हातकणंगले.
* द्वितीय: डी. सी. नरके विद्यानिकेतन व ज्युनि. कॉलेज, कुडित्रे, ता. करवीर.
* तृतीय: दूधसाखर विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय, बिद्री, ता. कागल, जि. कोल्हापूर.


Translate »
error: Content is protected !!