पुरंदरच्या पूर्व पट्ट्यात अवकाळी पावसाचे थैमान हाता तोंडाशी आलेली पिके गेली वाहून
मुख्य संपादक हनुमंत वाबळे:
उपसंपादक नवनाथ राणे:
पुरंदरच्या पूर्व पट्ट्यात अवकाळी पावसाचे थैमान
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असून नाझरे, जवळार्जुन, मावडी, पांडेश्वर, राजुरी, नायगाव तसेच परिसरातील इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
विशेषतः उसाचे भरघोस पीक पावसामुळे भुईसपाट झाले असून हरभरा, कांदा, मका यांसारख्या छोट्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पीक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
हातातोंडाला आलेला घास हातातून निसटल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला असून नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
तसेच पंचनामे करून सरकारकडून तातडीची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही शेतकऱ्यांची जोरदार मागणी होत आहे.






