महाराष्ट्र

जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त “भारत भूषण “राष्ट्रीय पुरस्कार विष्णू दादा भोसले यांना प्रदान


जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त ‘भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी – जागतिक मानव अधिकार दिनाचे औचित्य साधून आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन, ह्युमन राईट्स अँड अँन्टी करप्शन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकारचे नामदार रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान करून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास मुंबई जिल्हा न्यायाधीश मा. सादिकअली सय्यद, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सतीश केदारी, आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशनचे मनोज गवई यांच्यासह देशातील विविध राज्यांतील प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून नामदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षात तसेच आंबेडकरी चळवळीत केलेल्या निष्ठावान, सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल म्हणून हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

देशाच्या राजधानीतील न्यू महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात, आपल्या नेत्यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार मिळणे हे आयुष्यातील अभिमानास्पद व अविस्मरणीय क्षण असल्याची भावना पुरस्कारार्थी यांनी व्यक्त केली.

प्राप्त झालेला ‘भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार भारतीय संविधानाचे निर्माते, विश्वभूषण प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करण्यात आला आहे.

या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल संबंधित सर्व संस्थांचे तसेच विशेषतः रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांचे पुरस्कारार्थी यांनी मनःपूर्वक आभार मानले.


Translate »
error: Content is protected !!