पुणे शहर वाहतूक पोलिसांना सुरत वाला बिजनेस ग्रुप लिमिटेड सी एस आर फंडातून 500 दर्जेदार रेनसुटचे वाटप
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
पुणे शहर वाहतूक पोलिसांना सुरतवाला बिझनेस ग्रुपकडून 500 दर्जेदार रेनसूटचे वाटप
पुणे : पुणे शहरातील वाहतूक पोलिस बांधवांना पावसाळ्यात कर्तव्य बजावताना संरक्षण मिळावे या उद्देशाने सुरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेडच्या वतीने तब्बल 500 दर्जेदार रेनसूटचे वाटप करण्यात आले. पूर्व प्रादेशिक वाहतूक विभाग, पुणे शहरचे अप्पर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते हे रेनसूट पोलीस प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले.
सुरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेडच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. जलसंधारण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, अन्न, वस्त्र व निवारा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये पुणे जिल्ह्यासह इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते.
पावसाळ्यात वाहतूक पोलिसांना रस्त्यावर दीर्घकाळ उभे राहून कर्तव्य बजवावे लागते. त्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे आणि त्यांना काम करताना अधिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
या कार्यक्रमास सुरतवाला बिझनेस ग्रुप लिमिटेडच्या सीएसआर विभागाच्या पूजा थोरवे, श्रीराम तोतला, हेतवी सुरतवाला, धवल सुरतवाला यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी व वाहतूक अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुरतवाला बिझनेस ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करताना सांगितले की, “पोलिस बांधवांच्या हिताचा विचार करून करण्यात आलेली ही मदत अत्यंत उपयुक्त आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरतवाला बिझनेस ग्रुपच्या सीएसआर विभागातील सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.”






