शैक्षणिक

जिल्हा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने शहाजी पोमण यांचा सन्मान


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
उपसंपादक प्रासंदिप टिळेकर :
जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने शहाजी पोमण यांचा सन्मान

पिंपळे : पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व पुणे जिल्हा टी.डी.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६ चा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार पिंपळे विद्यालयातील शिक्षक श्री. शहाजी पोमण यांना प्रदान करण्यात आला.

रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी मयुरी लॉन्स, वाजेवाडी चौफुला, ता. शिरूर येथे झालेल्या कार्यक्रमात शहाजी पोमण यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजयदादा कोलते व सचिव शांताराम बापू पोमण यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य टी.डी.एफ.चे कार्यवाह के. एस. ढोमसे, अध्यक्ष जी. के. थोरात, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

शहाजी पोमण हे गेल्या २६ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत असून विद्यालयाच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी विद्यालयात स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम, दत्तक पालक योजना, मासूम संस्था व किर्लोस्कर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम, अप्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, वृक्षारोपण, पालक गृहभेटी, माजी विद्यार्थी संघाची स्थापना तसेच विद्यालयातील भौतिक सुविधांमध्ये सुधारणा यांसारखे विविध उपक्रम राबविले आहेत.

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत मिळवून देणे तसेच विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

आतापर्यंत मिळालेले पुरस्कार

1. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान, कोंढवा पुरस्कार – ५ सप्टेंबर २०११

2. प्राथमिक शिक्षक संघ, पुरंदर तालुका पुरस्कार – २०२३

3. माध्यमिक शिक्षक संघ जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार – २०२६

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश जाधव, प्रवीण पोमण, संदीप पोमण, माजी सरपंच पोमण नगर, सुहास क्षीरसागर, सचिन पोमण, दिगंबर पोमण, विलास चव्हाण, सचिन धनवट, सुनील जायकर, सौ. रेश्मा पोमण, सौ. स्वप्नाली खेनट यांच्यासह पिंपळे-पोमण नगर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहाजी पोमण यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Translate »
error: Content is protected !!