डॉ अण्णाभाऊ साठे क्रांती सेना( ए बी एस फोर्स ) च्या पुरंदर अध्यक्षपदी राजेंद्र कसबे यांची निवड,
सासवड प्रतिनिधी समीर भिंगारदिवे ::
डॉ अण्णाभाऊ साठे क्रांती सेना (एबीएस फोर्स) पुरंदर तालुका अध्यक्षपदी राजेंद्र कसबे यांची निवड
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील रहिवासी, कवी, लेखक, दिग्दर्शक आणि सामाजिक कार्याचा वारसा जपणारे राजेंद्र चंद्रकांत कसबे यांची डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना (एबीएस फोर्स) पुरंदर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यामध्ये राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे पुरंदर तालुका अध्यक्ष मंगेश गायकवाड, मातंग एकता आंदोलन तालुका अध्यक्ष आप्पासाहेब सकट, कार्यकर्ते चंद्रकांत भिसे, तसेच अखिल वडार संघटनेचे सासवड येथील राजेंद्र धोत्रे यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही कसबे यांना शुभेच्छा दिल्या.
आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राजेंद्र कसबे यांनी सांगितले की, समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असून, डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना (एबीएस फोर्स) च्या माध्यमातून ते यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहेत. तसेच संघटनेच्या बळकटीसाठी रात्रंदिवस काम करून संघटना वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






