सासवडमध्ये मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, पाच जनाविरुद्ध गुन्हा दाखल एक लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त :
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
सासवडमध्ये मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा, १.४० हजाराचा मुद्देमाल जप्त
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील म्हाडा कॉलनी परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर सासवड पोलिसांनी पहाटे धाड टाकून कारवाई केली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी पहाटे म्हाडा कॉलनीतील एका खोलीवर छापा टाकला असता आरोपी मोबाईलद्वारे व्हॉट्सअॅपवर ‘कल्याण बाजार’ नावाचा मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान चार मोबाईल फोन, मटका जुगाराचे बुक, हिशोबाची वही, चार्ट, कॅल्क्युलेटर तसेच अन्य साहित्य असा एकूण १ लाख ४० हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी विरेश जिनवगी, सलीम शेख, शेहेनशहा शेख, राजकुमार रोहारा आणि सागर जगताप यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३१/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.






