ताज्या घडामोडी

जवळार्जुन येथे आधार कार्ड दुरुस्ती व नोंदणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद ;


सहसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे :
जवळार्जुन येथे आधार कार्ड दुरुस्ती व नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुरंदर प्रतिनिधी : भारतीय डाक विभाग आणि ग्रामपंचायत जवळार्जुन यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, जवळार्जुन येथे आधार कार्ड सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिरामध्ये नवीन आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड अपडेट, पत्ता बदल, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, जन्मतारीख दुरुस्ती, बायोमेट्रिक अपडेट आदी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

राजेवाडी उपडाकघर (S.O.) येथील पोस्टल असिस्टंट राहुल यादव यांनी सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने कमी शुल्कात करून नागरिकांना तत्पर सेवा दिली. शिबिरात उपस्थित ग्रामस्थ, शिक्षक, शाळेचा स्टाफ तसेच मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

या शिबिरामध्ये एकूण ४० नागरिकांनी सहभाग घेतला असून त्यांनी आपल्या आधार कार्डाशी संबंधित विविध दुरुस्ती व अद्ययावत करण्याची कामे पूर्ण करून घेतली.


Translate »
error: Content is protected !!