सासवड शहरात भर दुपारी गोळीबार
दि. 18 गुरुवारी रोजी सासवड येथील एसटी स्टँड परिसरात एक गोळीबाराची घटना घडली.या गोळीबार मध्ये
एक जण गंभीर रित्या जखमी .या संदर्भात स्थानिक व
प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहिती प्रमाणे सासवड येथील बस स्थानका जवळ असणाऱ्या हडको कमान या
परिसरात हा प्रकार घडला असून… तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केला यावेळी एकावर गोळी झाडण्यात आली
गोळीबार यामध्ये ४१ वर्षीय राहुल नामदेव टिळेकर हे गंभीर
रित्या जखमी झालेत.जखमीला पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलय. सासवड एसटी बस
स्थानकासमोर टिळेकर हे आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय
करतात दुपारी चार वाजलेच्या दरम्यान ही
घटना घडलीय.घटनास्थळी पुणे ग्रामीणचे अधीक्षक पंकज
देशमुख यांनी प्रत्यक्ष जागी जाऊन पाहनी केली.यावेळी गुन्हा अन्वेषण विभागाचे अभिजीत शिळीमकर , भोर विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक दीपक वाकचौरे उपस्थित होते






