शैक्षणिक

सासवड सांस्कृतिक मंडळ व न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न!


उपसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे :
सासवड सांस्कृतिक मंडळ व न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण

जवळार्जुन : सासवड सांस्कृतिक मंडळ व न्यू इंग्लिश स्कूल, जवळार्जुन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या किल्ले स्पर्धा २०२५चे बक्षीस वितरण समारंभ दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी ही किल्ले स्पर्धा आयोजित केली जाते. पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजयजी जगताप यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या सर्व विद्यालयांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये इतिहास, संस्कृती आणि गड-किल्ल्यांविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

यंदाच्या स्पर्धेत एकूण ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून निगडे सर, गायकवाड सर, खोमणे सर, वायसे सर, काळाने मॅडम आणि नवनाथ राणे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या किल्ल्यांचे परीक्षण करून सर्व गुणांची बेरीज करण्यात आली आणि त्यानुसार विजेत्यांची निवड करण्यात आली. एकूण दहा विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

स्पर्धेतील प्रमुख बक्षिसे पुढीलप्रमाणे —

– प्रथम क्रमांक – ₹१,५०१ : माऊली नाना यांच्या स्मरणार्थ, शिवाजी राणे, अध्यक्ष – माऊली उद्योग समूह.
– द्वितीय क्रमांक – ₹१,१०१ : सतीश साळुंखे, जिल्हा परिषद गट समन्वयक, शिवसेना.
– तृतीय क्रमांक – ₹९०१ : प्रवीण पवार, यश कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स.
– चतुर्थ क्रमांक – ₹७०१ : ॲड. महेश राणे, चेअरमन – जवळार्जुन विविध कार्यकारी सेवा सोसायटी.
– पाचवा क्रमांक – ₹५०१ : नवनाथ राणे, उपसंपादक – सह्याद्री न्यूज.

स्पर्धेतील संपूर्ण ट्रॉफीचे सौजन्य अजिंक्य भैय्या टेकवडे, युवा प्रदेश सरचिटणीस, भाजप यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजिंक्य भैय्या टेकवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी राव राणे, सतीशजी साळुंखे, प्रवीणजी पवार, उत्तमराव निगडे, यश पवार, कृष्णा पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश पिसाळ सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड सर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व बक्षिसांचे वितरण करण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.


Translate »
error: Content is protected !!