क्राईम न्यूज

सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांना मारहाण ; दोघाविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सासवड, दि. 22 : सासवड येथील चिंतामणी हॉस्पिटलसमोर अपघात प्रकरणाची वैद्यकीय माहिती (एमएलसी) घेण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भिवराज बबन शिंदे (वय 39) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकित संदेश यादव (वय 34) व निलेश भालचंद्र गायकवाड (वय 35, दोघेही रा. हरणी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास सासवड येथील चिंतामणी हॉस्पिटलसमोर अपघातातील एमएलसी घेण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले होते. त्यावेळी अपघात करणाऱ्या सेलेरो कार (एमएच 46 एपी 8141) मधील आरोपींनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल महाद्वार यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 396/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 132, 121(1), 352, 351(2), 351(3), 3(5) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी वरिष्ठ निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.


Translate »
error: Content is protected !!