ताज्या घडामोडी

पुरंदर तालुक्याच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी बळीराम सोनवणे


पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदी बळीराम सोनवणे,

सासवड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या पुरंदर तालुक्याच्या अध्यक्षपदी सोनोरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील रहिवासी बळीराम काळूराम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली,

पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले, बळीराम सोनवणे हे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे खंदे समर्थक असून, गेले अनेक वर्षे ते रिपब्लिकन चळवळीत सक्रिय काम करीत

आहेत, यापूर्वी त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या शेतकरी आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणून व सासवड शहर अध्यक्ष म्हणून ही प्रभावीपणे काम केले आहे, त्यांची पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या तालूका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने , तालुक्यातील सर्व स्तरातून

त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे आणि जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष पुरंदर तालुक्यातील घराघरात पोहोचविण्यासाठी काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया नियुक्ती नंतर बळीराम सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली,


Translate »
error: Content is protected !!