पुरंदर हवेली मध्ये आमदार विजय शिवतारे यांचा निर्णय जनता दरबार – समस्यांचे तात्काळ निराकारण जनतेला दिलासा
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
नेतृत्वाची झलक!
पुरंदर-हवेलीमध्ये आमदार विजय शिवतारे यांचा निर्णायक जनता दरबार — समस्यांचे तात्काळ निराकरण, जनतेला दिलासा**
पुणे | 28 जून 2025:
जनतेचा आवाज केवळ ऐकण्यासाठी नव्हे, तर त्यावर तात्काळ कृती करण्यासाठी एक सक्षम नेतृत्व कसं असावं, याचं उत्कृष्ट उदाहरण आज पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळालं. आमदार विजय बापू शिवतारे यांच्या पुढाकाराने भरवण्यात आलेल्या “जनता दरबारात” आज असंख्य नागरिकांनी आपले प्रश्न मांडले आणि तेवढ्याच प्रभावीपणे त्या समस्यांवर उपाययोजना करण्यात आल्या.
हा दरबार केवळ निवडणूकपूर्व आश्वासनांचा भाग नव्हता, तर लोकशाहीतील जबाबदार नेतृत्वाची जाणीव करून देणारा उपक्रम होता. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत पार पडलेल्या या बैठकीत आमदार शिवतारे यांनी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत, नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावल्या.
विशेषत:
प्राथमिक शिक्षण विभागासाठी 16 ते 17 शाळांसाठी निधी त्वरित प्रस्तावित
ग्रामीण रस्त्यांचे काम मार्गी
पारगावमधील तीन शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी प्रत्येकी दोन लाख रुपयांची तातडीची मदत
कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा, ग्रामविकास अशा विविध विषयांवरील प्रलंबित तक्रारींचं निपटारा
“लोकशाही ही केवळ निवडणुकांची प्रक्रिया नसून, ती ही जबाबदारी आहे की, जनतेच्या प्रश्नांवर वेळेत आणि परिणामकारक पद्धतीने कृती करणे,” असे स्पष्ट शब्दांत आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले.






