मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त सासवडमध्ये भव्य रक्तदान शिबिर; 107 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग ¡
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सासवडमध्ये भव्य रक्तदान शिबिर; १०७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सासवड ता. २२ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सासवड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिक, युवक आणि पक्ष कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल १०७ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवसेवेचा आदर्श घालून दिला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आयोजित या शिबिराचे उद्घाटन पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्वतः रक्तदान करून उपस्थितांना सामाजिक कार्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
रक्तदान हे सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. वाढदिवसासारखा आनंदाचा दिवस समाजोपयोगी कार्याने साजरा करण्याची परंपरा अधिक बळकट व्हावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या रक्तदान शिबिराला जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विश्वास पानसे, भाजपा युवा मोर्चाचे माजी प्रदेश सचिव अजिंक्य टेकवडे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुमित काकडे, एनजीओ सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जगताप, युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष साकेत जगताप, किसान मोर्चा अध्यक्ष जालिंदर जगताप, नगरसेविका प्रियंका जगताप, सरचिटणीस राहुल भोंडे, जयेंद्र निकम, उपाध्यक्ष हर्षद जगताप, युवा मोर्चा सासवड शहराध्यक्ष तेजस चौरे, प्रवक्ते मंदार टिळेकर, सचिव योगेश खोपडे आदी उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन भाजपा सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप, उपाध्यक्ष उदयराज जगताप आणि सचिव ओंकार महागावकर यांनी केले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिबिर यशस्वी ठरल्याबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले.
सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराने सासवडमध्ये समाजहिताच्या उपक्रमांना नवी प्रेरणा दिल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
फोटो ओळ : सासवड येथे भव्य रक्तदान शिबिरात जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, माजी आमदार अशोक टेकवडे, शहराध्यक्ष आनंद जगताप व इतर






