राजकीय

शेतकरी आक्रोश मोर्चा : कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या निवासस्थानावर धडक


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
शेतकरी आक्रोश मोर्चा : कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या निवासस्थानावर धडक – उमेश पवार: अध्यक्ष युवक काँग्रेस पुणे जिल्हा

इंदापूर : अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही पुरेशी मदत व न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने बुधवार, दि. १० जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आंथुर्णे (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या निवासस्थानावर ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश प्रमोद पवार यांनी दिली.

या आंदोलनात नुकसानग्रस्त शेतकरी आपल्या शेतातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेला ऊस, केळी, डाळिंब तसेच इतर पिकांचे अवशेष कृषिमंत्र्यांना भेट म्हणून देऊन शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदविणार आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा, समस्या आणि संताप शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

तरी सर्व वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, डिजिटल मीडिया प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि पत्रकार बंधूंनी या आंदोलनास उपस्थित राहून शेतकऱ्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थळ : आंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे
दिनांक : १० जून २०२६
वेळ : सकाळी ९.३० वाजता


Translate »
error: Content is protected !!