सासवड पोलिसांच्या कडून धोकादायक पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई, दोन गुन्हे दाखल :
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सासवड प्रतिनिधी समीर भिंगारदिवे ::
सासवड पोलिसांकडून धोकादायक पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई; दोन गुन्हे दाखल
सासवड, दि. 20 जून 2026 : सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्त व धोकादायक पद्धतीने वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात सासवड पोलिसांनी कारवाई करत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या प्रकरणात गुन्हा रजि. नं. 277/2026 अंतर्गत मयुर संदाम कुंभारकर (वय 30, रा. उदाचीवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. दि. 20 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सासवड गाव हद्दीतील कोंढवा–सासवड रोडवरील हॉटेल मोहीनी समोर त्याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन (एमएच 12 यूएम 5439) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे उभे केले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाला.
दुसऱ्या प्रकरणात गुन्हा रजि. नं. 278/2026 अंतर्गत जयदीप बाळकृष्ण निकुडे (वय 34, रा. हनुमान चौक, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सासवड–बोपदेव घाट रोडवरील भोगळे वाईन्स समोर त्याने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन (एमएच 12 यूएफ 4572) धोकादायक पद्धतीने रस्त्यावर उभे केले होते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा व धोका निर्माण झाला.
या दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 285 अन्वये सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.
सार्वजनिक रस्त्यांवर नियमबाह्य व धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सासवड पोलिसांनी दिला आहे.






