क्राईम न्यूज

सासवड पोलिसांचा ॲक्शन मोड! एकाच वेळी सासवड शहर व पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारी सर्व गावांच्या मध्ये कोम्बिंग ; नाकाबंदी


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवडमध्ये पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’! नाकाबंदी अन् कोंबिंग ऑपरेशनने शहरात खळबळ

सासवड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर आणि सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरात व्यापक नाकाबंदी व तपासणी मोहीम राबवली. तीस गुन्हेगार चेक दोन वॉरंट मधील आरोपी ड्रंक अँड ड्राईव्हच्या दोन केस, इतर 17 कारवाया करत 15 हजार पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान शहरातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली. ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट तसेच वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले.

दरम्यान, सासवडमधील अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबा नगर परिसरात कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या या पोलिस कारवाईमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.

या ऑपरेशनमध्ये बारामती आरसीपी पथक क्रमांक १, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, पोलीस उपनिरीक्षक नारायण खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे यांच्यासह अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

तब्बल ६ अधिकारी, १८ पोलीस अंमलदार आणि ४ पोलीस वाहने या कारवाईत सहभागी झाली होती. मुख्य श्रीनाथ चौक परिसरातून या ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली.

सासवड शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दल रस्त्यावर उतरल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.


Translate »
error: Content is protected !!